प्लाझ्मा थेरपी म्हणजे?
प्लाझ्माथेरपी ?
कोरोना व्हायरस : प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय, त्यामुळे कोव्हिड-19 चे रुग्ण बरे होणार?कोव्हिडचा बरा झालेला पेशंट कोरोनाची लागण झालेल्या दुसऱ्या पेशंटला बरं करू शकतो? जगातल्या अनेक देशांमध्ये याप्रकारे रुग्णांवर उपचार सुरू झालाय. याला प्लाझ्मा थेरपी असं म्हणतात.प्लाझ्मा थेरपी काय आहे?
20 दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला मुंबईच्या एका हॉस्पिटलमधून फोन आला. तुम्ही नायर हॉस्पिटलमध्ये येऊन रक्त देऊ शकाल का? असं त्यांना विचारलं.
How to boost Immunity System?
त्या व्यक्तीने ताबडतोब रक्तदान केलं. आता या रक्तातला प्लाझ्मा वेगळा काढून त्यावर अभ्यास सुरू आहे. हाच प्लाझ्मा आता इतर कोव्हिड रुग्णांचे जीव वाचवू शकणार आहे.
कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, त्या व्यक्तीचं रक्त आता इतर पेशंट्चे जीव वाचवू शकेल.हे नेमकं कसं शक्य आहे?
तर एखादा विषाणू शरीरात शिरला की आपलं शरीर त्याला हुसकावून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करतं. विषाणू आणि आपल्यात होणाऱ्या या लढाईत आपले सैनिक असतात ते अँटिबॉडीज. एका विशिष्ट विषाणूला मारण्यासाठी आपलं शरीर विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करतं.
या अँटीबॉडीज आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात. कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शरीरात सोडल्या तर मग त्या वृद्ध व्यक्तीचं शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीनं दोन हात करू शकतं.
प्लाझ्मादान करणाऱ्या व्यक्तीसाठी 4 अटी आहेत-
डोनर म्हणजे दाता रुग्णाने कोव्हिड-19 शी यशस्वी लढा दिलेला पाहिजे.
दाता पूर्णपणे बरा झाल्याच्या 14 दिवसांनंतरच त्याचं रक्त घेता येतं. त्याचे कोरोनाचे दोन रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच प्लाझ्मा घेतलं जाऊ शकतं.
प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीने गेल्या तीन महिन्यात परदेश प्रवास केलेला असू नये.
त्या व्यक्तीला ताप किंवा श्वसनाशी संबंधित विकार असू नयेत.
या थेरपीने उपचार सरकारी हॉस्पिटलमध्ये होणार असल्याने त्यासाठी दोन ते तीन हजार रुपये एवढा खर्च येईल, असं डॉ. अनुप कुमार यांनी स्पष्ट केलं.
यापूर्वीही प्लाझ्मा थेरपीचा वापर
संसर्गजन्य रोगांवर उपचार म्हणून अनेक दशकांपासून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. सार्स, मर्स तसंच H1N1 या साथीच्या रोगांवेळीही प्लाझ्मा थेरपीचा वापर केला गेला होता.
पहिल्या महायुद्धात 1918 मध्ये पसरलेल्या स्पॅनिश फ्लू पासून लोकांची सुटका करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता.
इबोला या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांकरता प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता. इबोलाने थैमान घातल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने प्लाझ्मा थेरपीबाबत मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली.
कोरोना विषाणूवर लस निघालेली नाही. त्यासाठी वर्षभरापेक्षा जास्त काळ लागू शकतो. कोविडवर औषध नाही. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीकडून अनेक शास्त्रज्ञ आणि सरकारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

Comments
Post a Comment